Chinchwad Bye-Election: माझ्यासोबत कोणाता नेता नसला तरी जनता आहे – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज – माझ्याबरोबर कोणता नेता नसला तरी नागरिक (Chinchwad Bye-Election) आहेत. जनतेला गृहीत धरून चिंचवड विधानसभेचे राजकारण केले गेले. पाणी, अनधिकृत बांधकामे, शास्तीकराचा प्रश्न दोनही पक्षांनी सोडविला नाही. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदु समजून काम करायचे हे राज्यकर्ते विसरले आहेत, अशी टीका अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी भाजप-राष्ट्रवादीवर केली. समोर असलेल्या दोन उमेदवारांपैकी एक जण पाच वर्षात कधी महापालिकेत स्मार्ट सिटीच्या विरोधात बोलल्याचे आठवत नाही, असेही कलाटे म्हणाले.

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक शिट्टी या चिन्हावर लढत असलेले राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची रावेत येथे जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना कलाटे म्हणाले, गेल्या महिन्याभरात ज्या काही घडामोडी झाल्या. त्याचे साक्षीदार जनता आहे. ज्यांना सर्वात जास्त विश्वासात घ्यायला हवे होते. त्यांना गृहीत धरून चिंचवड विधानसभेचे राजकारण केले गेले.

त्याचे केंद्रबिंदू कोण असाल तर तुम्ही सर्वजण आहात. 2014 ला मी शिवसेनेचा उमेदवार होतो. त्यावेळी तुम्ही मला 65 हजार मते दिली. 2019 ला या मतदारसंघात कोणीही लढायला तयार नव्हते. प्रचंड दबावाखाली या मतदारसंघातील नागरिक होते. भाजपची मोठी लाट लोकसभेनंतर जाणवत होती. मला एक लाख 12 हजार मतांचे पाठबळ दिले.

मला पाठिंबा दिलेले म्हणत आहेत कि ती मते आमची होती. परंतु अॅड. प्रकाश आंबेडकर कधीही असे म्हणाले नाहीत कि ती मते आमची होती. ती मते जनतेची होती असेच ते म्हणतात. या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. आता भाजपची सत्ता आहे. मग कोणता प्रश्न सुटला? अनधिकृत बांधमकामाच्या प्रश्नावर सर्वजण सत्तेत आले. सुटला का तो प्रश्न ? ज्यावेळी प्राधिकरणाच्या जमिनी ‘पीएमआरडीए’ मध्ये गेल्या.

Chinchwad Bye-Election: भाजपला धडा शिकवा – अॅड. प्रकाश आंबेडकर

जो विकसित भाग आहे, तो महापालिकेकडे हस्तांतरित (Chinchwad Bye-Election) करण्यात आला. आम्ही सांगत होतो कि हे हस्तांतर करताना संबंधित घरे नागरिकांच्या नावावर करा. पण आजही हा प्रश्न सुटलेला नाही, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.