Chinchwad : पोलिसांचे देहू-आळंदीत लक्ष अन् चोरट्यांचा शहरात धुमाकूळ

एमपीसी न्यूज – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी निमित्त पिंपरी चिंचवड पोलिसांनी संपूर्ण (Chinchwad)लक्ष आळंदी आणि देहू या दोन तीर्थक्षेत्रांवर केंद्रीत केले आहे. शहरातील पोलिसांचे लक्ष देहू आळंदीत लागले असल्याचे दिसतात शहरातील चेन चोरटे सक्रिय झाले. चोरट्यांनी मंगळवारी (दि. 5) सकाळी भोसरी आणि सांगवी परिसरात दोन ठिकाणी दागिने हिसकावले.

संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने लाखो भावी आळंदी येथे दाखल होत आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतानाच शहरात चोरट्यांनी धुमाकूळ सुरू केला.

Alandi : आळंदीमध्ये काल भैरवनाथ जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

कासारवाडी ते रेल्वे स्टेशन रस्त्यावर सकाळी सव्वासहाच्या सुमारास एक महिला मॉर्निंग वॉक करत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेला दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील गंठण हिसका मारून चोरून नेले. महिलेने आरडाओरडा केला. मात्र, चोरटे गंठण घेऊन पसार झाले.

याप्रकरणी 33 वर्षीय महिला (रा. केशवनगर, कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरून आलेल्या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेन चोरीची दुसरी घटना सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दुसऱ्या गुन्ह्यात 59 वर्षीय महिला (रा. गणेश नगर, दापोडी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला सकाळी साडेसहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी (Chinchwad) घराबाहेर पडल्या होत्या. दरम्यान, दापोडी रस्त्यावर यशोदा मेडिकल समोर चालत असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून नेले.

लागोपाठ घडलेल्या या दोन्ही घटनांची शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. यापुढे अशा प्रकारच्या घटना होऊ नये यासाठी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांना पहाटेपासूनच बंदोबस्त लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.