Chinchwad : देशाच्या जडणघडणीत धनगर समाजाचे योगदान

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे मत

एमपीसी न्यूज – देशातील शेवटच्या घटकांतील (Chinchwad) म्हणजेच एनटी, एसटी आणि ओबीसी समाजातील लोकांच्या हितासाठी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे; तर देशाच्या कानाकोपऱ्यातून कामगार, कष्टकरी वास्तव्यास आलेले आहेत. धनगर समाज हा अत्यंत कष्टाळू राना- वनात राहणारा म्हणून ओळखला जातो. मात्र, या समाजाने गुणवत्तेच्या आधारे देशाच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान दिले आहे, असे मत भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केले.

Pimpri : मेट्रो चालविणा-या अपूर्वाचा राष्ट्रवादीतर्फे सत्कार

दिल्ली येथील ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने धनगर समाजातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे, विधानपरिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर, माजी नगरसेवक राजु दुर्गे, आशा शेडगे,  आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अंकुशराव भांड, अरुण पाडुळे, हनुमंत दुधाळ, निवांत कोळेकर, युवराज नरुटे, गजानन वाघमोडे, वैशाली भोजणे, मुकंद कुचेकर,

डॉ. दिनेश गाडेकर, अजय दुधभाते, महावीर काळे, विवेक बिडकर, संतोष पांढरे, नवनाथ देवकाते, संजय कवितके, दिपक राहिन्स, सोमनाथ ओव्हाळ, यशोदा नाईकवडे, दादा दोलतडे, बिरु व्हनमाने ,सुनिल बनसोडे,धनंजय तानले आदी उपस्थित होते.

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा  “काठी आणि घोंगडे” देऊन सन्मान केला. जगताप म्हणाले की,  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात देशातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांनी काशीविश्वेश्वर, वाराणसी, उज्जैन अश्या तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचा संकल्प केला आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी प्रचंड मेहनत करीत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीमध्ये धनगर समाजातील युवकांचे कामगारांचं कष्टकऱ्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे. या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःला सिद्ध करत विविध महत्त्वाच्या पदांवरती स्थान मिळवलेला आहे. ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या माध्यमातून असा हा गुणवंतांचा गौरव सोहळा निश्चितच आदर्शवत (Chinchwad)  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.