Chinchwad : पिंपरी-चिंचवड मधील दिग्दर्शक अच्युत नारायण यांना ‘प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक’ पुरस्कार

एमपीसी न्यूज – राज्य शासनाचा 57 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट ( Chinchwad) पुरस्कार सोहळा गुरुवारी (दि. 22) मुंबई येथे संपन्न झाला. या सोहळ्यात पिंपरी-चिंचवड येथील दिग्दर्शक अच्युत चोपडे (अच्युत नारायण) यांना प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी ही अतिशय अभिमानाची बाब मानली जात आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी चित्रपट क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या पहिल्याच मराठी चित्रपटाला पुरस्कार देखील मिळाल्याने केलेल्या कामाची पावती मिळाल्याचे समाधान अच्युत नारायण व्यक्त करतात.

अच्युत नारायण हे मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचे बीई इलेक्ट्रोनिक्स पर्यंतचे शिक्षण झाले. ते नोकरीच्या निमित्ताने सन 2005 साली पिंपरी-चिंचवड शहरात आले. आयटी पार्क मधील विप्रो या नामांकित कंपनीत ते 12 वर्ष चांगल्या पगाराची नोकरी करत होते. मात्र त्यांना चित्रपट क्षेत्राची आवड असल्याने त्यांचे मन आयटी क्षेत्रात रमले नाही.

Pune : गुरुवारी राज्यात पुणे शहराचे तापमान होते सर्वात कमी

12 वर्ष आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी आयटीला रामराम ठोकला आणि चित्रपट क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. मागील पाच वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. या कालावधीत त्यांनी 4 लघुचित्रपट केले. तसेच चिरूगोडवलू या तेलगु चित्रपटासाठी त्यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून देखील काम केले.

त्यानंतर त्यांनी ‘वेगळी वाट’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. अच्युत नारायण हे शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतीमधील अडचणी त्यांना माहिती आहेत. पण केवळ या अडचणी चित्रपटातून न मांडता त्यावर काढलेला मार्ग त्यांनी दाखवण्याचा निर्णय घेऊन चित्रपटात बाप आणि लेकीच्या गोड नात्यांमधून ‘वेगळी वाट’ चोखंदळली आहे. आपल्या मुलीसाठी बाप काय काय करतो आणि तो त्याला आलेल्या संकटांचा कसा सामना करतो हे त्यांनी अगदी चपखलपणे चित्रपटातून दाखवून दिले आहे.

या चित्रपटाची राज्य शासनाने दखल घेत अच्युत नारायण यांना प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक म्हणून गौरवले. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. अच्युत नारायण यांच्या वतीने त्यांचे निर्माते जयश्री शहा यांनी हा पुरस्कार ( Chinchwad) स्वीकारला.

57 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार विजेते

स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2022 –  विधू विनोद चोप्रा
स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2021 – सोनू निगम
स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2022 – ज्येष्ठ अभिनेत्री हेलन
सर्वोत्कृष्ट कथा- स्व.बा. बोरकर (पांघरुण)
सर्वोत्कृष्ट पटकथा- विक्रम फडणीस (स्माईल प्लिज)
सर्वोत्कृष्ट संवाद- इरावती कर्णीक (आनंदी गोपाळ)
सर्वोत्कृष्ट गीत- संजय कृष्णाजी पाटील (हिरकणी)
सर्वोत्कृष्ट पार्श्व संगीत- प्रफुल्ल-स्वप्निल
सर्वोत्कृष्ट संगीत- अमित राज
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक -सोनू निगम
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायका- मधुरा कुंभार (हिरकणी)
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक- सुभाष नकाशे (हिरकणी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- नंदिता पाटकर (बाबा)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- रोहित फाळके
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता- पार्थ भालेराव
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री- अंकिता लांडे
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- मृण्मयी देशपांडे (मिस यू मिस्टर)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- दीपक डोबरियाल (बाबा)
प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती- झॉलिवूड
प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक -अच्युत नारायण (वेगळी वाट)
सामाजिक प्रश्न हताळणारा दिग्दर्शक- समीर विध्वंस (आनंदी गोपाळ)
दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक-1 – अजित वाडीकर- चित्रपट- वाय
चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार- गजेंद्र अहिरे
चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान- 2022- नागराज मंजुळे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.