Chinchwad : भय अस्तित्वात नसून, अज्ञान व चुकांमुळेच निर्माण होते –  डॉ. जयश्री फडणवीस

एमपीसी न्यूज – भय हे अस्तित्वात नसून आपल्यातील अज्ञान व चुकांमुळे ते निर्माण ( Chinchwad ) होते.आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जे-जे चांगले आहे ते आत्मसात करा , असे मत मानसशास्त्र तज्ञ डॉ. जयश्री फडणवीस यांनी व्यक्त केले.

चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉम्प्युटर स्टडीजमध्ये प्रग्याण-1.0 आणि फ्लेअर फेस्टो 2024 हा उपक्रम सप्ताह स्वरूपात साजरा करण्यात आला.  समारंभाच्या प्रसंगी व्यासपीठावर उद्घाटक डॉ. जयश्री फडणवीस संस्थेचे सचिव डॉ.दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, प्राचार्य डॉ. अरूणकुमार वाळुंज, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, डॉ. जयश्री मुळे, प्रा.रसिका पाटील, प्रा. रोहित आकोलकर उपस्थित होते.

यात आंतर महाविद्यालयीन स्तरावर वादविवाद, सामान्यज्ञान आदी स्पर्धाचा तर, फ्लेअर फेस्टीमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभरातील विविध राज्याचे पारंपारिक वेशभूषा परिधान करून समुहनृत्य, वैयक्तिक, सांगीक, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाले.

Pune : सकस मुरघास रास्त दरामध्ये विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होणार – जीवन तांबे 

पारितोषिक समारंभाचे उद्घाटक डॉ. जयश्री फडणवीस यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कार संस्थेचे सचिव डॉ.दीपक शहा यांनी स्मृतीचिन्ह देवून केला. प्रग्याण-1.0 चे उद्घाटन संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा यांच्याहस्ते करण्यात आले. पारितोषिक वितरण यावर्षीचा मास्टर अ‍ॅण्ड मिस प्रतिभाचा मुकुट प्रतिभाच्या अथर्व दिघे व श्वेता वर्मा हिने पटकाविला. प्रमुख पाहुण्या डॉ. जयश्री फडणवीस, सचिव डॉ. दीपक शहा व प्राचार्य डॉ. अरूणकुमार वाळुंज यांच्याहस्ते स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक पुरस्कार विविध स्पर्धेतील विजेते गुणवंत क्रिडापट्टू व प्राध्यापकांना प्रदान करण्यात आले.

प्रख्यात मानसशास्त्र व्याख्यात्या डॉ. जयश्री फडणवीस विद्यार्थी व प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या, मी कोण? याचा प्रथम अभ्यास करा. आपल्यातील बलस्थाने व कमतरता काय आहे, याचे स्वतःच निरीक्षण करून नवीन तंत्रज्ञान कोणती आहे, उज्वल भवितव्यासाठी काय करायचे आहे, याचे निरीक्षक व शिक्षण आत्मसात करा.

प्राचार्य डॉ. अरूणकुमार वाळुंज यांनी वार्षिक अहवाल वाचन करून गुणवंत विद्यार्थी व प्राध्यापकांचे विशेष कौतुक केले. प्रग्यान 1-0 या कार्यक्रमाचे संयोजन उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, प्रा. शगुणकला देवी यांनी तर, फ्लेअर फेस्टो 2024 चे प्रा. रोहित अकोलकर, प्रा. रसिका पाटील समवेत आदींनी केले.

पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. श्रृती गणपुले व डॉ. रूपा शहा यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. रोहित अकोलकर यांनी मानले. सप्ताहात विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम ( Chinchwad ) घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.