Pune : सकस मुरघास रास्त दरामध्ये विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होणार – जीवन तांबे 

एमपीसी न्यूज – थोड्याच दिवसांमध्ये तयार होणारा सकस मुरघास रास्त ( Pune) दरामध्ये विक्रीसाठी बाजारामध्ये उपलब्ध होणार आहे, अशी माहिती फार्मर कंपनीचे चेअरमन जीवन तांबे यांनी दिली.

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांच्या माध्यमातून रांजणगाव सांडस, ता. शिरुर येथे तांबे गुरुजी फॉडर प्लस फार्मर प्रोड्युसर कंपनी ली. रांजणगाव सांडस ता. शिरुर जिल्हा पुणे येथे केंद्र सरकारच्या, ‘10,000 एफपीओ निर्मिती’ यांजन अंतर्गत दि.05 /07/2023 रोजी सदर कंपनी स्थापण करणेत आली होती. ही कंपनी स्थापन झालेनंतर लगेचच नव्याने सभासद झालेल्या सभासदांना कंपनीच्या माध्यमातून मका बियाणाचे रास्त दरामध्ये वाटप करणेत आले व त्याच्या माध्यमातून सभासदांच्या 25  एकर शेतजमिनीवर अॅडव्हान्टा 756  या जातीच्या मका पिकाची लागवड डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात करणेत आलेली होती.

Mahavitran : सरकारी कार्यालयांच्या वीजबिलांची थकबाकी 23 कोटींवर

एकरी 20 टन मका चाऱ्याचे उत्पादन मिळाले असून कात्रज दूध संघाचे संचालक, निखिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली या कंपनीच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने मुरघास तयार करणेत आला असून चारा उत्पादन कामकाजास प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे. संघाचे विद्यमान संचालक निखिल तांबे यांनी या कंपनीच्या माध्यमातून एप्रिल ते मे महिन्या पर्यंत 2000  मेट्रीक टन मुरघास तयार करणेचा मानस व्यक्त केला आहे. मुरघास तयार केलेमुळे उन्हाळ्यामध्ये व चारा टंचाईच्या काळात हिरवा चारा जनावरांसाठी उपलब्ध होणार असल्यामुळे याकाळात जनावरांची उत्पादन क्षमता कमी न होता वाढणार आहे. भविष्यामध्ये चारा उत्पादनाशी निगडीत असणाऱ्या सर्व क्रियाकल्पाचा वापर करुन अधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कंपनीचा व सभासदांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल? या मानसिकतेतून यापुढे कामकाज करणेत येईल अशी माहिती दिली.

यापुढील काळात दूध आणि दुग्धव्यवसायामध्ये प्रगती करायची असेल तर जास्तीत जास्त प्रमाणात मुरघास जनावरांना खाऊ घातलेस उच्च गुणवत्ता असलेल्या जास्तीत जास्त दूधाची निर्मती करणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन संघाचे विद्यमान चेअरमन भगवानराव पासलकर यांनी यासमयी व्यक्त ( Pune) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.