Chinchwad : ….त्यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासारखे रिअल स्टार्स बनावे लागते – रोहिणी खडसे

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात 5 जानेवारी रोजी (Chinchwad) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी झंझावती दौरे केले. यावेळी महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे म्हणाल्या “राज्यातील महिलांचे प्रश्न सोशल मीडियावर रिल्स टाकून सुटू शकत नाहीत. तर त्यासाठी आधी शरद पवार साहेब, सुप्रिया ताई सारखे लोकांच्या मनातील रिअल स्टार्स बनावे लागते. अशी जोरदार टीका त्यांनी विरोधकांवर केली. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कसे काम करावे यावर मार्गदर्शन केले.

वाढती महागाई, बेरोजगारी, महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराविरोधात विरोधकांना योग्य त्या भाषेत उत्तर देण्यास पुढे मागे बघू नका अश्या सूचना देखील महिला पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच  शरद पवार  यांच्या पन्नास वर्षाच्या कालखंडात महिला सक्षमीकरण धोरणामुळेच आज महाराष्ट्रात महिलांना सन्मानाने वागणूक मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी महिला शहर अध्यक्ष आणि त्यांच्या टीमच्या कामाचे देखील कौतुक केले.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिला शहर अध्यक्ष ज्योती निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तीनही विधानसभेत कार्यक्रम राबवले गेले. चिखली येथे भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष सारिका हरगुडे यांनी उत्तम कार्यक्रमाचे आयोजन केले. विविध क्षेत्रांमधील काम करणाऱ्या 200 स्त्रियांना “सन्मान स्त्री शक्तीचा” या कार्यक्रमातून सन्मानित केले.\

Kothrud : कोथरूडमध्ये मनसेला धक्का; राज ठाकरे यांचे जवळचे पदाधिकारी मंदार बलकवडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

तर सावित्रीबाई फुले जयंती निमित्त पिंपरी येथे ज्येष्ठ सामाजिक प्रबोधनकार शारदा मुंडे यांचे “जागर सावित्रीच्या लेकींचा” या व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मी सावित्री बोलते हा एकपात्री प्रयोग सादर केला. तसेच अनेक महिलांचा सन्मान देखील करण्यात आले. यावेळी मा उपमहापौर विश्रांती पाडाळे यांना प्रदेश सचिवपदी तर शोभा  साठे यांची पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात (Chinchwad) आली.

सांगवीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित “जागर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा” शिवव्याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. युवक सरचिटणीस मेघराज लोखंडे व ॲडव्होकेट प्रिया देशमुख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

रोहिणी खडसे यांनी खानदेश भागातील शहरात वसलेल्या प्रमुख लोकांच्या देखील गाठीभेटी घेतल्या. शहरात सर्व ठिकाणी ठिकाणी महिला प्रदेशाध्यक्ष यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी युवक शहरअध्यक्ष इम्रान भाई शेख, प्रदेश सरचिटणीस राजन नायर, युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर, संदीप चव्हाण, सचिन निंबाळकर, राजेश हरगुडे, विश्रांती पाडाळे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष स्वप्नाली असोले, भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष सारिका हरगुडे, अश्विनी आगळे, पंचशीला आगळे, सुजाता पाटील नाजुका वाल्हे, हनीफ शेख, रेखा मोरे, अलका खंडागळे, प्राची ससाने, संगीता अवधूते, जयश्री झेंडे, जोशना बैध आणि मोठ्या संख्येने महिला व युवक पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.