Chinchwad : वेताळनगर मध्ये शॉर्टसर्किट मुळे घराला आग

एमपीसी न्यूज – चिंचवडगाव येथील वेताळनगरमध्ये   (Chinchwad ) एका घरात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. ही घटना गुरुवारी (दि. 7) सकाळी घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वेताळनगर येथे पुनर्वसन प्रकल्पातील बिल्डींग नंबर पाच मध्ये अशोक तेलंग यांचे कुटुंब पहिल्या मजल्यावर राहते. जुने कपडे घेऊन त्याबदल्यात भांडी विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. दिवसभर शहरात फिरून ते कपडे जमा करून भांडी विकत असतात. गुरुवारी सकाळी तेलंग आणि त्यांचे कुटुंबीय आपल्या कामासाठी सकाळी बाहेर पडले.

Pune : सुखकर सहजीवनाचा दुसरा डाव, एक आगळावेगळा परिसंवाद

त्यानंतर त्यांच्या घरात इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाले आणि घरात आग लागली. घरात मोठ्या प्रमाणात कपडे असल्याने त्यावर ही आग पसरली आणि मोठ्या प्रमाणात आगीचे लोट घरातून बाहेर येऊ लागले. याबाबत अग्निशमन विभागाला माहिती मिळाली असता पिंपरी मुख्य केंद्र येथील दोन, थेरगाव, रहाटणी आणि प्राधिकरण येथील प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, कपड्याची आग काही वेळ सुरु राहिली. त्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. हा धूर इमारतीमधील सर्व घरांमध्ये गेल्याने नागरिकांची धावपळ झाली. तेलंग यांचे संपूर्ण घर या आगीत जळून खाक झाले आहे. सुदैवाने घरात कोणी नसल्याने जीवित हानी झाली  (Chinchwad ) नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.