Chinchwad: इच्छाशक्तीच्या जोरावर अडचणीवर मात केल्यास धेय्यपूर्ती शक्य -महापौर राहुल जाधव

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांना बालपणातच योग्य मार्गदर्शन लाभले. तर, भविष्यात ते विद्यार्थी ऊंच शिखर गाठू शकतात. चांगला भविष्यकाळ तुमच्या शिक्षणातच दडला आहे, असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले. यश प्राप्त करण्यासाठी कष्ट करावे लागतात. इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही प्रकारच्या अडचणीवर मात करुन धेय्यपूर्ती करता येते असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिका, नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने आज (सोमवारी) प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे शहरातील विद्यालयातून शालांत परिक्षेत 80 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाच्या वेळी ते बोलत होते.

  • यावेळी सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, महिला व बाल कल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, अ प्रभाग अध्यक्षा, अनुराधा गोरखे, ब प्रभाग अध्यक्षा, करुणा चिंचवडे, नगरसदस्या सुनिता तापकीर, शर्मिला बाबर, निर्मला कुटे, आरती चोंधे, आश्विनी चिंचवडे, आश्विनी जाधव, मिनल यादव, नगरसदस्य नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्य्क आयुक्त स्मिता झगडे, अण्णा बोदडे, नागरवस्ती विकास योजना या विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले, सुहास बहादरपुरे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक व शिक्षक उपस्थित होते.

यावेळी महापौर राहुल जाधव म्हणाले, ”आई-वडिलांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यात याव्यात. भविष्याची वाटचाल ही अटीतटीची आहे. आपल्या यशामुळे आई-वडिलांना वेगळयाच आनंदाची अनूभुती येते. यश प्राप्त करण्यासाठी कष्ट करावे लागतात. इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही प्रकारच्या अडचणीवर मात करुन धेय्यपूर्ती करता येते”.

  • सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ”लोककल्याणाच्या योजनांचा विद्यार्थ्यांनी व पालकांनी लाभ घ्यावा. करीयरमध्ये नावलौकीक केला पाहिजे एखादा वैद्यकीय क्षेत्रात मोठा डॉक्टर सर्जन होणे ही वेगळी बाब आहे. परंतू त्या सर्जनची ओळख व नावलौकिक ज्यावेळी जनमानसात होतो, तोच खरा सर्जन म्हणून नावारुपाला येतो. विद्यार्थ्यांनी उत्तमप्रकरचे गुण संपादन केले म्हणजे सर्व काही झाले असे नाही. तर प्रत्येकाने माणूस म्हणून, माणूसकी जोपासून जनमानसात काम केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करावा. परंतू समाज कारणाबरोबरच राजकारणातही त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवून चांगले कार्य पार पाडावे”

महिला व बाल कल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे म्हणाल्या, ”स्वामी विवेकानंदांना अपेक्षित तरुण घडला पाहिजे. शहराचे तुम्ही भावी शिल्पकार आहात, जसे आई वडिल तुमच्या उन्नतीसाठी स्वप्न पाहात असतात. तसेच तुमचा परिसर व तुम्हाला मदत करणारे, तुमचे हितचिंतक हे ही तुमच्यासाठी आशा बाळगत असतात. मोबाईलचा वापर अनिष्ट कामासाठी करु नये”.

  • यावेळी व्याख्याते प्रा.अरविंद नातू, प्रा.आनंद देसाई, आणि सचिन वाघ यांनी करियर मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन पर व्याख्यान दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.