Chinchwad : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावला. ही घटना बुधवारी (दि. 23) रात्री सव्वाआठच्या सुमारास महाबली चौक, शाहूनगर, चिंचवड येथे घडली.

स्वरजीत श्रीकांत जोशी (वय 18, रा. माउली अपार्टमेंट, शाहूनगर, चिंचवड) या तरुणाने याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास फिर्यादी स्वरजीत महाबली चौकातून रस्त्याने पायी जात होता. तो श्रीनिवास सोसायटी समोर आला असता पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्याचा 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक बंबाळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.