Pimpri: ‘ठाकरे’ चित्रपटाला दणक्यात सुरुवात; मोशीत ढोल ताशाच्या निनादात चित्रपटाचे स्वागत

एमपीसी न्यूज – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘ठाकरे’ हा सिनेमा आज (शुक्रवारी) मराठी आणि हिंदीत प्रदर्शित झाला असून पिंपरी- चिंचवडमध्ये चित्रपटाला दणक्यात सुरुवात झाली आहे. मोशीत महिलांनी नऊवारी साडी नेसून व फेटा बांधून पारंपरिक वेशभूषेत ढोल ताशाच्या निनादात चित्रपटाचे जोरदार स्वागत केले. सगळीकडे भगवेमय वातावरण निर्माण झाले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘ठाकरे’ हा सिनेमा आजपासून देशभरातील अडीच हजार सिनेमागृहात मराठी आणि हिंदीत प्रदर्शित झाला आहे. सकाळपासून चित्रपटाला जोरदार सुरुवात झाली असून सध्या सगळीकडे ‘ठाकरे’चीच हवा आहे.

मोशीतील स्पाईन सिटी मॉल येथे शिवसेनेच्या शिरूर जिल्ह्याच्या महिला संघटिका सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकाऱ्यांनी नऊवारी साडी परिधान करत, फेटा बांधून पारंपरिक वेशभूषेत ढोल ताशाच्या निनादात ‘ठाकरे’ चित्रपटाचे जोरदार स्वागत केले. सगळीकडे भगवेमय वातावरण निर्माण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.