Chakan : न्यायालयाच्या आदेशाला बगल देत कामगारांचे कंपनीत आंदोलन

एमपीसी न्यूज – खेड दिवाणी न्यायालयाने ह्युंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट प्रा. लि या कंपनीच्या आवारात आणि आसपास 500 मीटरच्या आत आंदोलन करण्यास मनाई केली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून काही कामगारांनी कंपनीसमोर आंदोलन केले. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 24) दुपारी पाचच्या सुमारास घडली.

अंकुश निवृत्तीराव राजोळे (वय 56, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संतोष बेद्रे, रुपेश म्हाळसकर, विजय काळोखे, नवनाथ पवार, अंकुश बोत्रे, संदीप घाटे, शुभम मोहिते, सचिन सायकर, सुधाकर कांबळे आणि त्यांचे अन्य 25 साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खालुंब्रे येथील ह्युंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट प्रा. ली या कंपनीतील काम जुलै 2017 मध्ये बंद केले. त्यानंतर 2018 मध्ये खेड दिवाणी न्यायालयाने या कंपनीच्या आवारात अथवा कंपनीच्या आसपास 500 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यास मनाई केली होती. त्या आदेशाचे उल्लंघन करत गुरुवारी काही कामगारांनी कंपनीच्या गेटसमोर आंदोलन केले. बेकायदेशीर जमाव जमवून घोषणा दिल्या. तसेच काही कामगारांनी जबरदस्तीने कंपनीत घुसून झेंडा लावला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.