Pimpri : महापालिकेतील कर्मचारी बडतर्फीला उच्च न्यायालयाची स्थगिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत समाजसेवक पदावर कार्यरत असलेल्या संतोषी सुदाम चोरघे यांच्या बडतर्फीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर चोरघे यांना पुन्हा महापालिका सेवेत दाखल करुन घेण्यात आले आहे. याप्रकरणाच्या न्यायालयीन निकालानंतर चोरगर यांच्या सेवेबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर नागरवस्ती विकास योजना विभागात समाजसेवक संवर्गाची चार पदे मंजूर आहेत. त्यापैकी एका पदावर चोरघे यांची अनुसूचित जमाती या राखीव संवर्गातून नियुक्‍ती करण्यात आली होती. नियुक्‍तीनंतर सहा महिन्यामध्ये चोरघे यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र प्रशासनाला सदर करणे आवश्‍यक होते. मात्र, त्यांना वेळोवेळी मुदतवाढ देऊनही त्यांनी हे प्रमाणपत्र सादर केले नव्हते. त्यानंतर त्यांची विभागीय चौकशी करुन, त्यांना महापालिका सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. या विरोधात चोरघे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्याचे आदेश आयुक्‍त हर्डीकर यांनी दिले आहेत.

दरम्यान, महापालिका आस्थापनेवर समाजसेवक संवर्गाची एकूण चार पदे मंजूर आहेत. त्यापैकी चोरघे यांच्यासह एकून तीन पदांवर नियुक्‍त्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी दोन कर्मचा-यांना राज्य सरकार सेवेत संधी मिळाल्याने त्यांन यापदाचा राजीनामा दिला. तर चोरघे यांना बडतर्फ करण्यात आले होते. याशिवाय एक जाग रिक्‍त आहे. अशाप्रकारे आता समाजसेवक पदावर आता केवळ एक कर्मचारी काम करत असल्याचे चित्र आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.