Chinchwad News : वाहतूक पोलिसाला भरधाव कारने उडवले

एमपीसी न्यूज – चिंचवड वाहतूक विभागाच्या (Chinchwad News) कार्यालयासमोर वाहतुकीचे नियमन करत असलेल्या एका वाहतूक पोलिसाला भरधाव कार चालकाने उडवले. वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरून घेऊन जात जीवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रकार मंगळवारी (दि. 4) सायंकाळी साडेचार वाजता घडला.

किरण माणिकराव घोडके (वय 30) असे जखमी वाहतूक पोलिसाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 02/बीवाय 1644 क्रमांकाच्या कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : 21 ते 26 एप्रिल 2023 दरम्यान पुण्यात रंगणार रोलबॉलची आंतरराष्ट्रीय स्पर्धा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घोडके हे चिंचवड वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. मंगळवारी सायंकाळी ते वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर वाहतुकीचे नियमन करत होते.

त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या कारने घोडके यांना उडवले. त्यांना बोनेटवर घेऊन काही अंतरावर नेले. या घटनेत घोडके यांच्या हातातील इ चलन मशीन फुटून नुकसान झाले. तसेच घोडके जखमी (Chinchwad News) झाले. घटना घडल्यानंतर आरोपी वाहन चालक घटनास्थळी न थांबता भरधाव वेगात कारमधून पळून गेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.