Pune : 21 ते 26 एप्रिल 2023 दरम्यान पुण्यात रंगणार रोलबॉलची आंतरराष्ट्रीय स्पर्धा

एमपीसी न्यूज : येत्या 21 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान (Pune) पुण्यात श्री शिवछत्रपती क्रीडानगरी म्हाळुंगे बालेवाडी येथे रोलबॉलची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धेची तयारी जोरात सुरु असल्याचे स्पर्धा समितीचे अध्यक्ष व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

आज मुंबईत ह्या स्पर्धेच्या मानचिन्हाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्पर्धेचे प्रमुख  चंद्रकांत पाटील, क्रीडा मंत्री गिरीष महाजन, रोलबॉल या खेळाचे जनक राजू दाभाडे, रोलबॉल संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप खर्डेकर, उपाध्यक्ष ऍड.अमोल काजळे पाटील, मुंबई रोलबॉल संघटनेचे सचिव जयप्रकाश सिंग आणि चंदन जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व क्रीडा मंत्री महोदयांना स्पर्धेच्या उदघाट्न व समारोपाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. ते त्यांनी स्वीकारले तसेच स्पर्धेला सर्वतोपरी मदत करू असे वचनही दिले. आत्तापर्यंत ह्या स्पर्धेसाठी 32 देशांनी सहभाग नोंदविला असून त्यांची व्हिसा प्रक्रिया देखील पूर्ण झाली असल्याचे राजू दाभाडे व संदीप खर्डेकर यांनी सांगितले.

Pune : पुणे शहराला मिळणार वंदे भारत एक्स्प्रेसची भेट

या स्पर्धेचा जन्म पुण्यात झाला असल्यामुळे व आता तब्ब्ल 57 देशात हा वेगवान खेळ खेळला जात असल्याने त्याची पुण्यात होणारी आंतरराष्ट्रीय स्पर्धा यशस्वी व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे पुण्याचा पालकमंत्री आणि संयोजन समितीचा अध्यक्ष ह्या नात्याने माझे कर्तव्य असल्याचे मी (Pune) मानतो असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

या स्पर्धेसाठी क्रीडानगरी मधील बॅडमिंटन हॉल सुसज्ज करत असून जगभरातून येणाऱ्या स्पर्धकांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.