Pune : पुणे शहराला मिळणार वंदे भारत एक्स्प्रेसची भेट

एमपीसी न्यूज : वंदे भारत एक्सप्रेसला सध्या प्रवाशांची चांगलीच पसंती मिळत आहे. त्यामुळे हळूहळू या सुविधेचा विस्तार करण्यात येणार आहे. (Pune) सध्या पुणेकरांसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहे. परंतु ही रेल्वे मुंबई ते सोलापूर आहे. वंदे भारत एक्स्प्रेसपुणे रेल्वे स्टेशनवरुन सरळ कोणत्याही शहरात जात नाही. परंतु आता ही अडचण दूर होणार आहे. लवकरच पुणे शहरातून थेट वंदे भारत ट्रेन सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यामुळे लवकरच पुण्याहून वंदे भारत एक्स्प्रेसने थेट दुसऱ्या राज्यापर्यंत जाणार आहे.

तिरुपती ते हैदराबाद अशी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबाद ते विशाखापट्टणम दरम्यान चालवली जात होती. आता आणखी दोन शहरे हैदराबादला वंदे भारत एक्स्प्रेसने जोडण्यात येणार आहे. यापैकी एक ट्रेन हैदराबाद ते बंगळुरूपर्यंत धावणार आहे. तर दुसरी पुणे ते सिकंदराबाद अशी असणार आहे. यामुळे पुणे शहर थेट हैदराबादला वंदे भारत एक्सप्रेसने जोडल जाणार आहे.

Talegaon Dabhade : तळेगावकर रसिकांना कविवर्य प्रा.अशोक बागवेंच्या कवितांनी केले मंत्रमुग्ध

सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांनी चांगलीच पसंती दिलीय. मागील पंचेचाळीस दिवसात तब्बल 50 हजार प्रवाशांनी वंदेभारत एक्स्प्रेसने प्रवास केलाय. (Pune) 45 दिवसांमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसने चार कोटी रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न कमविले आहे. सोलापूर ते पुणे आणि पुणे ते मुंबई यां पल्ल्यात 100 टक्के तर सोलापूर ते मुंबई या पल्ल्यात 70 टक्के लोकांनी प्रवास केलाय. लवकरच उन्हाळी सुट्टी सुरु झाल्यानंतर गाडीचे बुकिंग अधिक होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केलाय.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.