Talegaon Dabhade : तळेगावकर रसिकांना कविवर्य प्रा.अशोक बागवेंच्या कवितांनी केले मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज : नागरिक मंच तळेगाव आणि नगर परिषद तळेगाव दाभाडे यांच्या वतीने  शनिवारी यशवंत नगरच्या जैवविविधता उद्यानात माझी वसुंधरा अभियानांतर्गत (Talegaon Dabhade) सुप्रसिद्ध कविवर्य अशोक बागवेंच्या कवितांचा सुंदर आणि मनाला भिडणाऱ्या काव्य गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता .

निसर्गाच्या सानिघ्यात  झालेल्या या कार्यक्रमाची सुरूवात झाली ती वृक्ष पुजनाने. दरवेळी कार्यक्रमाच्या सुरूवातीला केलं जाणारं दीपप्रज्वलन न करता वृक्ष पुजनाचा एक वेगळा विचार या कार्यक्रमाने पुढे आणला. त्याचप्रमाणे एक जागृत नागरिक या नात्यानं हरीत शपथ घेऊन कार्यक्रम सुरू झाला. तळेगाव नगर परिषदेच्या सुवर्ण काळे यांनी शपथ वाचन केले

मा.मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक, मा.वसंत भापकर ( अध्यक्ष नागरिक मंच), मा.नगर सेवक निखिल भगत आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्ष पूजन करण्यात आले.

Pavana Sahakari Bank : अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील – ज्ञानेश्वर लांडगे

कविवर्य अशोक बागवें एका पेक्षा एक सुंदर आणि रसिकांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या कविता सादर केल्या.  मराठी साहित्याची आजवरची परंपरा, मराठी भाषेला प्राप्त होऊ शकणारा अभिजात दर्जा, अगदी त्याच वेळी मराठी शाळांची गरज अशा अनेक विषयांवर साहित्यीकांनी त्यांची मतं त्यांच्या काव्यातून व्यक्त केली. (Talegaon Dabhade) आपल्या आईवर  प्रेम करा हे जसं आपल्याला सांगावं लागत नाही अगदी तसंच आपल्या भाषेवर प्रेम करा असं सांगावं लागू नये ही काहीशी जबाबदारीच या कार्यक्रमाने मराठी भाषिकांवर टाकली असं म्हणायला हरकत नाही.

 

कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं

कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा आपण कवितेसारखं बसायचं…….

ही कविता आणि

नदीच्या किनारी नदीला म्हणावे

तुझे पूर माझ्या नसांतून यावे….

या कविवर्य अशोक बागवें यांच्या अर्थगर्भ कवितांना रसिकांच्या टाळ्यांची विशेष दाद मिळाली.

कविवर्य अशोक बागवें त्यांचे कवी मित्र सतीश सोळांकूरकर व जनार्दन म्हात्रे यांनीही त्यांच्या कविता सदर केल्या. तिनही कवींनी त्यांचा उत्तम कविता सादर केल्या आणि जणू सकस आशय म्हणजे काय याचा आनंद रसिकांपर्यंत पोहोचवला. मराठी टिकेलच पण तिचं टिकणं का महत्त्वाचं आहे हे अधोरेखित करणारा हा कार्यक्रम होता

आपल्या मनोगतात बागवेंनी ‘रसिकांचा असा माहोल खूप दिवसांनी मिळाल्याचे सांगितले. काव्य मैफिलीला मा.सुरेश साखवळकर,मा.नगरसेवक निखिल भगत डॉ.गणेश सोरटे, (Talegaon Dabhade)नागरिक संघाचे अध्यक्ष वसंत भापकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मैफिलीचे ध्वनी संयोजन केदार अभ्यंकर यांचे होते तर या अनोख्या काव्य मैफिलीचे उत्तम आयोजन निरंजनजहागीरदार,विश्वास देशपांडे,सचिन कहडणे,निलेश जाचक,मिलिंद देशपांडे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.