Chinchwad News : कोयता बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – कोयता बाळगल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. गुरूवारी (दि. 14) रात्री दहा वाजता भीम चेतना मित्र मंडळ, भीमनगर, चिंचवडगाव येथे चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली.

प्रेम उत्तम जगताप (वय 21, रा. तालेरा हॉस्पीटलमागे, भीमनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने विनापरवाना कोयता जवळ बाळगला होता. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई आहे, आरोपीने या आदेशाचा भंग केला. चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.