Chinchwad News : रस्त्याकडेला पार्क केलेल्या कारची चोरी

एमपीसी न्यूज – रस्त्याच्याकडेला पार्क केलेल्या कारची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. हा प्रकार बुधवारी (दि. 27) रात्री साडेअकरा ते गुरुवारी दि. 28 सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास स्पाईनरोड, कृष्णानगर, चिंचवड येथे घडला.

अरुण दत्तात्रय पोवार (वय 61, रा. स्पाईनरोड, कृष्णानगर, चिंचवड) यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची एक लाख 75 हजार रुपये किमतीची शेवरलेट तवेरा ही गाडी बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास स्पाईनरोड कृष्णानगर येथे सर्व्हिस रोडवर रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांची गाडी चोरून नेली. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.