Chinchwad : शहरात दर सोमवारी नो हॉर्न डे ; पोलीस उपायुक्त बापू बांगर यांचा उपक्रम

एमपीसी न्यूज – दररोज लाखो वाहनांच्या हॉर्नमुळे होणाऱ्या ( Chinchwad ) गोंगाटापासून एक दिवस तरी सुटका होण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी नवीन उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक सोमवारी नो हॉर्न डे उपक्रम साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या उपक्रमांतर्गत सोमवारी कोणत्याही वाहन चालकाने हॉर्न वाजवू नये यासाठी वाहतूक पोलीस शाळा, कॉलेज, आयटी इंडस्ट्री, एमआयडीसी मध्ये जाऊन नो हॉर्न डे संदर्भात जनजागृती करणार आहेत.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांनाच कामावर जाण्याची तसेच कामावरून पुन्हा घरी येण्याची घाई असते. मात्र, वाहतूक कोंडीमुळे कोणालाही या गोष्टी वेळेत करता येत नाहीत. वाहतूक कोंडीत अडकल्यावर प्रत्येक वाहन चालक वाहनाला जागा मिळावी म्हणून हॉर्न वाजवितो.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण होते. ध्वhttps://www.youtube.com/watch?v=RLA1Cnz-kzY&pp=ygUIbXBjIG5ld3M%3D नी प्रदूषणाचा त्रास वाहन चालकासह रस्त्यावर तसेच आसपास असणाऱ्या सर्वच नागरिकांना सहन करावा लागतो. या ध्वनी प्रदूषणामुळे अनेकांना कानाचे विकार तसेच मानसिक विकार झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत.

Dighi : भविष्य सांगण्याचा बहाणा करून महिलेचे मंगळसुत्र लुबाडले

या बाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, सामाजिक संस्था तसेच वाहतूक संस्थांकडून वारंवार जनजागृती करण्यात आली आहे. मात्र, वाहन चालक याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होणाऱ्या अनेक ठिकाणी सातत्याने ध्वनी प्रदुषण होताना दिसते.

यावर उपाय म्हणून प्राथमिक स्वरूपात दर सोमवारी वाहन चालकांनी नो हॉर्न डे पाळावा, असा निर्णय शहर वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी वाहतूक पोलीस प्रत्येक शाळा, महाविद्यालये, आय टी इंडस्ट्री आणि एमआयडीसी मध्ये जाऊन जनजागृती करणार आहे.

निष्कारण हॉर्न वाजणे किती धोकादायक आहे, ध्वनी प्रदुषण वाढल्याने काय परिणाम होतात याबाबत वाहतूक पोलिस जनजागृती करणार आहेत.

पोलीस उपायुक्त बापू बांगर म्हणाले, “घरातून बाहेर पडल्यानंतर इच्छित स्थळी जाईपर्यंत वाहन चालक प्रत्येक किलोमीटरला किमान पाच वेळा हॉर्न वाजवतो.

यामुळे शहरातील वायू प्रदूषणात खूप वाढ होत असून, वाहन चालकांचे मानसिक स्वास्थ्य देखील खराब होत असते. यामुळे वाहन चालकांना विनंती असून, आपण एक दिवस अजिबात हॉर्न वाजविला नाही तर हळूहळू हॉर्न वाजविण्याची सवय कमी होत जाईल असा विश्वास बांगर यांनी व्यक्त ( Chinchwad ) केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.