Dighi : भविष्य सांगण्याचा बहाणा करून महिलेचे मंगळसुत्र लुबाडले

एमपीसी न्यूज – पायी जाणाऱ्या महिलेला ( Dighi) जवळ बोलावून देवाचे व भविष्याबद्दल सांगतो म्हणून महिलेचे सोन्याचे मंगळसुत्र लुबाडले आहे. ही घटना गुरुवारी (दि.2) सकाळी साडे दहा वाजता दिघी येथे घडली आहे.

महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pune : पुणे विद्यापीठात पुन्हा गोंधळ ; भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दिघी येथील विठ्ठल-रुक्मीणी मंदिराजवळून पायी घरी जात होत्या. यावेळी आरोपींनी त्यांना खूणवून जवळ बोलावून घेतले. त्यांना देवाचे व भविष्याचे सांगता येते असे सांगितले.

फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी वर देव प्रसन्न होणार आहे सांगून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे 70 हजार रुपयांचे मंगळसुत्र घेतले. त्यावर मंत्र फुकण्याचा बहाणा करून मंगळसुत्र पिशवीत ठेवले आहे सांगत महीलेला लुबाडले.

आपली फसवणूक झाली आहे समजताच फिर्यादीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत ( Dighi) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.