Chinchwad : श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन  उत्साहात

एमपीसी न्यूज – चिंचवड  शिवतेज नगर येथील श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघाचा (Chinchwad)दहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी स्वामी या अंकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष  प्रा. हरिनारायण शेळके (Chinchwad)यांनी संघाचा दहा वर्षाचा आढावा घेतला. माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी जेष्ठ नागरिक संघ घेत असलेल्या कार्यक्रमाची व उपक्रमाची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी  ” ज्येष्ठांचे सर्वांगीण आरोग्य ” या विषयावर अतिशय सखोल व मार्मिक असे प्रबोधन पर व्याख्यान दिले.

उतारवयामध्ये सुखद आयुष्य जगायचे असेल तर, ज्येष्ठांची विचारसरणी कशा पद्धतीची असावी याविषयी मार्गदर्शन केले. नागरिक करत असलेल्या सर्व कार्याचा गौरव पूर्वक असा उल्लेख केला. संघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात शंखानाद आणि स्वागत गीताने झाली. याप्रसंगी काही मान्यवरांचा उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मान देखील करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन सारिका रिकामे यांनी केले. आभार प्रदर्शन पर मनोगत राजाराम सावंत व अशोक सूर्यवंशी यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शोभा नलगे ,नीता खरे  ,दिनकर पंडित ,यशवंत भोळे  ,कांचन नेवे ,शिंदे सर ,कैलास सराफ ,मनीषा देव आदींनी परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.