Shardanagar : औषधी वनस्पती व जीव विज्ञानातील संशोधन”वर आधारित राष्ट्रीय परिषदेचे आयोजन 

एमपीसी न्यूज – 2 व 3 फेब्रुवारी 2024 रोजी शारदाबाई पवार महिला महाविद्यालय (Shardanagar )शारदानगर येथे वनस्पतीशास्त्र विभागाने औषधी वनस्पती व जीव विज्ञानातील संशोधनावर आधारित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. 
राष्ट्रीय परिषद पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्र, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय, भारत सरकार, वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही परिषद आयोजित केली आहे.
संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त सचिव सुनंदा पवार, कार्यकारी(Shardanagar)अधिकारी निलेश नलवडे, मानवी संसाधन प्रमुख गार्गी दत्ता व डॉ. दिगंबर मोकाट यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेच्या आयोजनाची तयारी सुरू आहे. या परिषदेसाठी महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगड, गोवा इत्यादी राज्यांमधील 150 हून अधिक शास्त्रज्ञ, संशोधक, विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी होत आहेत, असे परिषदेचे निमंत्रक व प्राचार्य डॉ. एस. व्ही. महामुनी यांनी सांगितले
डॉ. सत्यांशू कुमार, (आनंद) डॉ. अरुण चंदन (धर्मशाळा) डॉ. एस के दास (भुवनेश्वर) डॉ. दत्तात्रय नाईक (पुणे), प्रा. के एस लड्डा (मुंबई), प्रा. अरविंद धाबे (छत्रपती संभाजीनगर), डॉ. प्रकाश ईटणकर (नागपूर), डॉ. बिना लॉरेन्स (कन्याकुमारी), डॉ. अजय नामदेव (पुणे), डॉ. संगोराम अपूर्वा (पुणे), प्रा. डॉ. दिगंबर मोकाट (पुणे), इत्यादी संशोधक शास्त्रज्ञ या परिषदेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

या परिषदेमध्ये सुगंधी वनस्पती व त्यांचे नॅनो सायन्स व जैवतंत्रज्ञान, व त्यांचे उपयोग, जैव विविधता व ॲग्रोटेक्नॉलॉजी, औषधी व सुगंधी वनस्पती मार्केटिंग व मूल्य संवर्धन इत्यादी विषयांवर संशोधकांमध्ये चर्चा, विचारविनिमय व मार्गदर्शन होणार आहे.
 या परिषदेचे उद्घाटन 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता होत असून ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, डॉ. एस. एस. मगर, माजी कुलगुरू, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, मूलराज वडोर, संचालक, आयुर्वेदिक ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, मुंबई हे उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी खास शेतकऱ्यांसाठी विशेषत: औषधी वनस्पतींचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खास अश्वगंधा व इतर प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या वनस्पतींच्या शेती संदर्भात कार्यशाळेचे आयोजन केले असून यामध्ये पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राचे विभागीय संचालक प्रा. डॉ. दिगंबर मोकाट मार्गदर्शन करणार असल्याचे या परिषदेच्या संयोजन सचिव प्रा. डॉ. बी. एम. सकदेव यांनी सांगितले. यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन समन्वयक व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर. बी. देशमुख यांनी केले आहे. सहभागासाठी इच्छुक सन्माननीय शेतकऱ्यांनी 9822891669, 9960259067 या क्रमांकावर संपर्क करावा.
 परिषदेच्या समारोप प्रसंगी परिषदेत सादर झालेल्या उत्कृष्ट संशोधन पत्रिकेच्या संशोधकास पारितोषिक देवून गौरविण्यात येईल. परिषदेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या औषधी वनस्पतीसंबंधीत पेंटिंग, ड्रॉइंग, वक्तृत्व, निबंध इत्यादी स्पर्धेच्या विजेत्यांचाही उचित गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. वनस्पती संवर्धन व पुनरुत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्ती यांचाही सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.