Chinchwad : हेल्मेट वापराबाबत वाहतूक पोलिसांकडून जनजागृती

एमपीसी न्यूज – रस्ते अपघातांमध्ये हेल्मेट नसणाऱ्यांचे मृत्यूचे (Chinchwad) प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे हेल्मेट वापराबाबत वाहतूक पोलिसांनी जनजागृतीची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये वाहन चालकांना हेल्मेटचे महत्व पटवून देण्यात आले.

वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी याबाबत माहिती दिली. रस्ते अपघातांमध्ये मृत्यू होणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. त्यातही हेल्मेट अभावी डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वात अधिक आहे. मोटार वाहन कायद्यानुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविताना वाहन चालक आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीला हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे.

तरीही दुचाकी चालकांकडून हेल्मेटचा वापर केला जात नाही. त्यामुळे चिंचवड वाहतूक विभागाच्या हद्दीत गुरुद्वारा चौक, रिव्हर व्ह्यू चौक, एसकेएफ रोड, दळवीनगर ब्रिज येथे जनजागृतीची मोहीम राबविण्यात आली.

Pimpri : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उत्तेजक इंजेक्शन आणि गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकास अटक

बिना हेल्मेट वाहनाच्या अपघातांचे फ्लेक्स बनवून ते चौकांमध्ये (Chinchwad) लावण्यात आले. हेल्मेट नसल्यामुळे अपघातांची दाहकता त्यातून दाखवण्यात आली. ज्या वाहन चालकांनी हेल्मेट घातलेले आहे, अशा वाहन चालकांचा पोलिसांनी सत्कार केला.

वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करावा. तसेच वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.