Chinchwad : जागतिक महिला दिनानिमित्त ‘महिला आरोग्य सन्मान अभियान’

अनुष्का स्त्री मंचच्या अध्यक्षा शर्मिला महाजन यांची माहिती

एमपीसी न्यूज – अनुष्का स्त्री मंच, द्रृष्टी कम्युनिकेशन आणि लोकमान्य हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त ‘मोफत महिला आरोग्य सन्मान अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

महिला सन्मान अभियानाचे उदघाटन बुधवार दि. 27 फेब्रुवारीला पोलीस आयुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते प्राधिकरण येथील सावरकर भवन येथे सायंकाळी चार वाजता होणार आहे, अशी माहिती अनुष्का स्त्री मंचच्या अध्यक्षा शर्मिला महाजन यांनी दिली.

  • या कार्यक्रमात आपण मराठी दिनाचे औचित्य साधून काही महिलांचा त्यांच्या भरीव कार्याबद्दल विनिता देशपांडे, मंजुषा देशपांडे, रेणू इनामदार आणि सायली सांभारे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी माजी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेविका शर्मिला बाबर उपस्थित राहणार आहे. दि. 27 फेब्रवारी ते 8 मार्च या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे.

  • या उपक्रमात स्त्रियांच्या विविध आरोग्यविषयक समस्या, मासिक पाळी तक्रारी, आरोग्य विषयक समस्या, स्तन आरोग्य तपासणी याविषयी लोकमान्य हॉस्पिटल निगडी आणि चिंचवड येथे स्त्रीरोग तज्ञ, स्त्री जनरल सर्जनमार्फत तपासणी केली जाणार आहे. मधुमेह, कॅन्सर वाढते वजन, स्थौल्य याविषयी देखील तज्ञांद्वारे तपासणी आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. ही वैद्यकीय तपासणी मोफत असणार आहे. तसेच विविध अनुषंगाने करण्यात येणा-या तपासण्या सवलतीच्या दरात होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.