Pimpri : आमदारांनी विधानसभेत औद्योगिक विजदर वाढीच्या विरोधात आवाज उठवावा; संदीप बेलसरे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – औद्योगिक क्षेत्रातील संकटाची नोंद घेऊन पिंपरी-चिंचवडमधील सर्व आमदारांनी विधानसभेत या संदर्भात आवाज उठवावा. हा प्रश्न धसास लावावा, असे जाहीर आवाहन पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी जाहीर प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रसिद्धीसाठी दिली आहे.

या दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, “सप्टेंबर २०१८ पासून राज्यातील सर्व औद्योगिक वीज ग्राहकांच्या बिलामध्ये २० टक्के ते २५ टक्के वाढ झालेली आहे. राज्यातील विजदर शेजारील सर्व राज्यांच्या तुलनेने २५ टक्के ते ४० टक्के जास्त झालेले आहेत.

  • जागतिक स्पर्धेत टीकाव धरता येत नाही. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात प्रचंड आर्थिक संकट व असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे औद्योगिक वीज दरवाढ संपूर्णपणे रद्द करण्यात यावी. त्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबर २०१८ ते मार्च २०२० पर्यंतच्या १९ महिन्यांच्या दरफरकापोटी ३४०० कोटी रू. अनुदान महावितरण कंपनीस द्यावे.” या मागणीसाठी राज्यातील सर्व औद्योगिक संघटनांच्या वतीने मंगळवार दि. १२ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे व वीज बिलांची होळी आंदोलन जाहीर करण्यात आले होते.

राज्यातील सर्व औद्योगिक संघटनांच्या उस्फूर्त सहभागाने राज्यात १२ फेब्रुवारी रोजी २० ठिकाणी मोर्चे आणि वीज बिलांची होळी आंदोलन यशस्वी झाले. त्याचप्रमाणे आताच्या सरकारने यापूर्वी वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. त्यासाठी सरकारने सप्टेंबर २०१८ ते मार्च २०२० या १९ महिन्यासाठी ३४०० कोटी रूपये अनुदान द्यावे आणि दर स्थिर ठेवावेत, अशी सर्व औद्योगिक संघटनांची मागणी आहे. सरकारने याबाबत निर्णय घ्यावा. यासाठी आमदारांनी विधानसभेत हा प्रश्न धसास लावावा, असे जाहीर आवाहन पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

  • संपूर्ण देशात पिंपरी-चिंचवडची उद्योग नगरी म्हणून ओळख असून ती ओळख नष्ट होऊ लागली आहे .पिंपरी-चिंचवडमधील अनेक मोठ्या उद्योगांनी परराज्यात स्थलांतर केले असून वाढत्या विजदरामुळे उद्योजकांना उद्योग चालवणे जड जात आहे. अनेक लघु आणि मध्यम उद्योग बंद अथवा स्थलांतरित करण्याच्या मनस्थितीत आले असून त्यामुळे कामगारांपुढे बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे. सदर विजदर वाढ रद्द न झाल्यास हजरो उद्योजक व कामगार देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे हि विजदर वाढ पूर्णपणे रद्द झाली पाहिजे. दि. २५ फेब्रुवारी पासून अधिवेशन सुरू होत आहे.

या अधिवेशन काळात सरकारने याबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा वीज दर वाढ पूर्णपणे रद्द झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही.अधिवेशन संपेपर्यंत निर्णय न झाल्यास अधिक उग्र आंदोलन करण्यात येईल, असेही पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी जाहीर केले आहे.

  • आमदारांनी विधानसभेत औद्योगिक वीज दर वाढीच्या विरोधात आवाज उठवावा. अधिवेशन संपेपर्यंत निर्णय न झाल्यास अधिक उग्र आंदोलन करण्यात येईल, असेही पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी जाहीर केले आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमधील सर्व आमदारांना वैयक्तिक आवाहन पत्र, निवेदन व संबंधित माहिती पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच या प्रश्नावर विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडून हा प्रश्न सोडवावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेतर्फे करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.