Wakad : खंडणी प्रकरणी माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनच्या शहर अध्यक्षाला अटक

एमपीसी न्यूज – ‘मी माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे. माझ्या परवानगीशिवाय कंपनीत कामगार कसे काय ठेवले’ अशी धमकी देत एका तरुणाला बेदम मारहाण केल्या प्रकरणी  माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनच्या पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्षाला त्याच्या तीन साथीदारांसह अटक करण्यात आली.

India News – रेडमी 12 च्या लाँचची तारीख जाहीर

रमाकांत उर्फ बबलू राजेंद्र जोगदंड (वय 30, रा. मंगलनगर, वाकड), समीर उर्फ बबलू नझीर शेख (वय 33, रा. नढेनगर, काळेवाडी), मयूर बाळासाहेब सरोदे (वय 23, रा. भुजबळ चौक, पुनावळे), करण सदाफळ चव्हाण (वय 24, रा. पुनावळे गावठाण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, माऊली चौक वाकड येथे एका कंपनीच्या कार्यालयात काहीजण काम करत होते. त्यावेळी आरोपी तिथे गेले. आरोपी बबलू जोगदंड आणि त्याच्या साथीदारांनी कामगारांना दम दिला. ‘मी येथील माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे. माझ्या परवानगीशिवाय येथे कामगार कसे काय ठेवले, असे म्हणत आरोपींनी एका कामगाराला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या हातातील 15 हजार रुपयांचे घड्याळ आणि 25 हजार रुपयांची सोन्याची अंगठी जबरदस्तीने हिसकावून नेली.

याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर वाकड पोलिसांनी दोन पथके तयार केली. एका पथकाने वाशी नवी मुंबई येथून बबलू जोगदंड आणि समीर शेख यांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांच्या साथीदारांसोबत मिळून माथाडी संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगून गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी अन्य आरोपींना देखील अटक केली.

आरोपी रमाकांत उर्फ बबलू जोगदंड हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी वाकड, चतुश्रुंगी, हिंजवडी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. तर समीर शेख याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. आरोपी बबलू जोगदंड हा माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनचा पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष आहे.

तसेच जोतीबानगर काळेवाडी येथे देखील अशा पद्धतीचा गुन्हा घडला होता. सुरेश बाबुराव बनसोडे (वय 37, रा. रहाटणी) याने तीन ट्रक चालकांना अडवून त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. तसेच ट्रकची तोडफोड करून रोख रक्कम जबरदस्तीने काढून नेली होती. याप्रकरणी सुरेश बनसोडे याला वाकड (Wakad) पोलिसांनी अटक केली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहायक निरीक्षक संतोष पाटील, अनिल लोहार, उपनिरीक्षक मकसूद मणेर, सचिन चव्हाण, सहायक फौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदू गिरे, संदीप गवारी, दीपक साबळे, स्वप्नील खेतले, अतिश जाधव, प्रमोद कदम, प्रशांत गिलबिले, अतिक शेख, अजय फल्ले, तात्या शिंदे, कौंतेय खराडे, भास्कर भारती, स्वप्नील लोखंडे, सौदागर लामतुरे, रमेश खेडकर, सागर कोतवाल, हेमंत गुत्तीकोंडा, सागर पंडित यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.