Maval : लोहगडावर पर्यटकांनी अनुभवले सुनियोजित व्यवस्थापन

एमपीसी न्यूज – मागील अठवड्यात मावळातील लोहगड किल्ला हा हाऊस फुल्ल झाला होता.  तेथे पर्यटक तब्बल चार तास अडकून होते. त्यावर उपाय म्हणून रविवारी (दि.9) पोलीस प्रशासन व भारतीय पुरातत्व विभागाने पूर्ण तयारी केली होती. त्यामुळे या रविवारी गर्दीचा नाही तर, सुनियोजीत व्यवस्थापन व पावसाचा पर्यटकांनी आनंद घेतला.

Wakad : खंडणी प्रकरणी माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनच्या शहर अध्यक्षाला अटक

नेहमीप्रमाणे रविवारी लोहगड व विसापूर किल्ल्यांच्या परिसरात हजारो पर्यटक  वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी आले होते. याचा विचार करत भाजेमार्गे व दुधीवरे खिंड मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक रचना करण्यात आली होती, त्यामुळे वाहतूक कोंडी टाळता आली.

 

तसेच ठीक ठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्यामुळे वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन केले होते. बहुतेक ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे निदर्शनास आले. वाहतूक नियमनासाठी ठीक ठिकाणी सूचना फलक लावण्यात आलेले होते. भारतीय पुरातत्व विभागाने देखील लोहगडावर पर्यटकांच्या गर्दीचे व्यवस्थित नियोजन केले होते.

 

पर्यटकांना सुरक्षितते संबंधी लाऊड स्पीकर वर सूचना देण्यात येत होत्या. त्यामुळे लोहगडावर गर्दीचे नियंत्रण राखता आले. तसेच लोहगड पर्यटकांसाठी दुपारी तीन वाजता बंद करण्यात आल्यामुळे दिवसाच्या शेवटी होणारी गर्दी टाळता आली.

 

लोहगडावर 4 जुलै रोजी  पर्यटकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच प्रचंड वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. हा अनुभव लक्षात घेता पोलीस प्रशासन व भारतीय पुरातत्व विभागाने आज उत्तम नियोजन केले होते. याबद्दल बऱ्याच पर्यटकांनी समाधान व्यक्त केले.

 

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने यासंबंधी निवेदन देण्यात आले होते. रविवारी मंचाचे बहुसंख्य कार्यकर्ते देखील लोहगडावर उपस्थित होते. उत्तम वाहतूक व्यवस्था व गर्दीवरील नियंत्रण प्रशासनानी व्यवस्थित पार पाडले. त्यामुळे मंचातर्फे सचिन टेकवडे, विश्वास दौंडकर, संदीप गाडे, अनिकेत आंबेकर आदी कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.