Chinchwad theft : चिंचवड येथून कपड्यांच्या दुकानातून लाखांचे कपडे चोरीला

एमपीसी न्यूज –  कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून (Chinchwad theft) चोरट्यांनी सुमारे लाख भर रुपयांचे कपडे चोरून नेले आहेत. ही घटना रविवारी (दि.6) ते सोमवार (दि.7) या कालावधीत घडली.

याप्रकरणी नितीन शंकर दातीर (वय 33 रा. चिंचवड) यांनी पिंपरी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Ujjwal Keskar : पुढील 8 दिवसांत प्रभाग रचना तयार करणार : उज्ज्वल केसकर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे फस्ट लूक मेन्स वेअर हे कपड्याचे दुकान बंद करून गेले असता, चोरट्यांनी रविवारी रात्री उशीरा कशाच्या तरी सहाय्याने शटर (Chinchwad theft) उचकटून दुकानात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी दुकानातून 185 टी शर्ट, 265 जीन्स पॅन्ट व हुडीज अशे एकूण 94 हजार 450 रुपयांचे कपडे चोरून नेले आहेत. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.