Chinchwad : मंदिरातील दानपेटी फोडणारा गजाआड, तर दोघे फरार

एमपीसी न्यूज – एका मंदिरातील दानपेटी (Chinchwad) फोडून दुसऱ्या मंदिरात दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. तर दोघे जण फरार झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री एक ते सव्वा एकच्या दरम्यान चिंचवड, काळभोरनगर येथे घडली आहे.

प्रदीप गंगाराम शिंदे (वय 58 रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून रोहीत राहूल शिंदे (वय 22) याला अटक केली. तर लाला व बाबु (पुर्ण नाव माहिती नाही) हे दोघे फरार आहे.

Moshi : ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’च्या पूर्वतयारीची व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनी साई मंदिरातील दानपेटीतील अंदाजे 4 हजार रक्कम तसेच लाकडी पेटीचे कुलुप तोडून 11 हजार 478 रुपये रोख (Chinchwad) चोरून नेले आहेत. तसेच ते शिव मंदिरातील दानपेटी फोडून 7 हजार 478 रुपये चोरून नेण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी एका आरोपीला अटक केली असून दोघे फरार झाले आहेत. पिंपरी पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.