Pimpri : नागरिकांच्या तक्रारीची दखल घ्या

मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीची मागणी 

एमपीसी न्यूज  – पिंपरी चिंचवड महानगरपालिने सारथी पोर्टल चालू करून बरेच वर्षे झाली आहेत.आयुक्त श्रीकर परदेशी असतांना प्रशासनावर व त्यांची  त्यांनी सुरू केलेल्या पोर्टलवर वचक राहिला होता. अनेक नगरसेवकही सारथीच्या माध्यमातुन नागरी समस्या सोडवत असे .त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांनाही न्याय मिळत असे . पण आता या तक्रारींचा निपटारा होत नाही. तरी नागरिकांच्या तक्रारीची दखल घ्यावी अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे. 

दिलेल्या निवेदनांत त्यांनी  म्हटले आहे की, सारथी हेल्पलाईन बरोबरच केंद्र सरकारचे “पी एम ओ” व राज्य सरकारचे “आपले सरकार” हे ही सारथीला पोर्टलला जोडलेले आहे. पालिका आपल्या पातळीवर संबंधित तक्रारी असतील त्या सोडवते. पालिकेच्या विविध संर्दभातील  नागरिकानी दोन लाख पंधरा हजार तक्रारी केल्या होत्या. त्यापैकी 2120 तक्रारी प्रलंबीत आहेत पिंपरी चिंचवड शहर आणि महानगरपालिकेच्या संबंधित जाने 2017 पासून ऑगस्ट 2018 पर्यंत सरकारी पोर्टल ,एस एम ,एस ,सारथी हेल्पलाईन ,सोशल मीडिया, मोबाईल अँप ,यासारख्या माध्यमातून तक्रारी आलेल्या आहेत .त्यापैकी 2 हजार 120 प्रलंबित आहेत .याचा पूर्ण निपटारा होत नसल्यामुळे परत तक्रारीत वाढ होत. या सर्व नागरी समस्यामुळे पिंपरी चिंचवड चा राहन्यायोग्य पडताळणी 69 वा.नंबर आला आहे .तर पुण्याचा देशात चांगले राहण्यासाठी शहर म्हणून पहिला क्रमांक आला आहे. स्वच्छते च्या बाबती पण पुण्याने बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत.

आयुक्त पण वारंवार कर्मचा-यांना  सुधारणा करण्यास सांगत असतात तरी तेवढया गांभीर्याने कर्मचारी घेत नसल्याचे यावरून दिसुन येते. तक्रारींचे लवकरात लवकर निपटारा करून नागरीकांना सहकार्य करावे अशी मागणीही त्यांनी या निवेदनांत केली.

या निवेदनावर शहर उपाध्यक्ष विकास शहाने, मुरलीधर दळवी, संगिता जोगदंड, अरुण मूसळे,अँड सचिन काळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.