Vadgaon Maval : – पतसंस्थांनी बँकिंग साक्षरता अभियानाचा उपक्रम राबवावा – प्रदीप गारटकर

एमपीसी न्यूज – बँकांचे कामकाज आणि व्यवहाराबाबत असलेल्या अज्ञानामुळे फसवणुकीसारखे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी पतसंस्थांनी बँकिंग साक्षरता अभियानाचा उपक्रम हाती घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले.

मावळ तालुक्यातील संपूर्णतः महिला संचालित एकमेव पतसंस्था असलेल्या तनिष्का नागरी सहकारी पतसंस्थेच्या दुसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, सहाय्ययक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी, पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष बबनराव भेगडे, कामगार नेते अरुण बोराडे, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, उद्योजिका सुप्रिया बडवे, ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे, संतोष भेगडे, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, नगरसेविका वैशाली दाभाडे, प्रमिला बाफना, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा जगताप, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, संतोष मुर्हे, दीपक हुलावळे, सुनीता काळोखे, शीतल हगवणे आदी उपस्थित होते.

संजोग वाघेरे यांनी अर्चना घारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिला पदाधिकारी संस्था यशस्वीपणे चालवत असल्याबद्दल कौतुक केले. यावेळी, ह.भ.प.मंगल महाराज जगताप, अशोक बकरे, अर्चना मुर्हे , अनुप्रिया खाडे, स्वाती दाभाडे, उर्मिला काकडे, सुधीर ढोरे, पंकज गाडे, यश बधाले, शुभांगी माळी, सोमनाथ गोपाळे यांचा तनिष्का गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

अर्चना घारे यांनी प्रास्ताविक केले, ज्योती बधाले यांनी स्वागत तर अनिल धर्माधिकारी यांनी सूत्रसंचालन केले. अहवाल वाचन मनीषा वाघोले, सारिका विनोदे, शबनम खान, ललिता कोतुळकर यांनी केले, सचिव सुमित्रा दौंडकर यांनी आभार मानले. शुभांगी कारके, वैशाली ढोरे, कमल गराडे, मनीषा आंबेकर, सुवर्णा गाडे, सीमा बालगुडे, स्वाती भेगडे, कल्पना काजळे, पुष्पा घोजगे, सुवर्णा राऊत यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.