Cricket New Rule : ‘स्टॉप क्लॉक’ नियमामुळे प्रतिस्पर्धी संघाला मिळणार ज्यादा 5 धावा; आयसीसीचा 60 सेकंदाचा नवा नियम काय आहे?

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ‘स्टॉप क्लॉक’ हा नवा नियम जाहीर केला (Cricket New Rule) आहे. खेळाचा वेग वाढवण्यासाठी किंवा सरासरी वेळ राखण्यासाठी हा नियम आणण्यात आला आहे. या नवीन नियमाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मुख्य कार्यकारी समितीने मंजुरी दिली आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपासून हा नवा नियम लागू होणार आहे. ही मालिका 3 डिसेंबरपासून सुरू होत आहे.

या नवीन नियमामुळे संघांना त्यांच्या षटकांचा वेग कायम ठेवावा लागणार आहे. अन्यथा विरोधी संघाला दंडाच्या स्वरूपात फायदा मिळेल. अन्यथा विरोधी संघाला पेनल्टी रन्स देण्यात येतील. या नियमामुळे आता पाच धावांचा फायदा थेट फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळणार आहे.

हा नवा नियम आगामी काळात संघाच्या विजय-पराजयातही निर्णायक भूमिका बजावू शकतात. त्यामुळे अशा पेनल्टी धावा टाळण्यासाठी संघाच्या कर्णधारांना वेळेवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

स्टॉप क्लॉक नियम काय आहे?

षटकांमधला वेळ नियंत्रित ठेवण्यासाठी क्रिकेटमध्ये ‘स्टॉप क्लॉक नियम’ लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत, “मागील षटक पूर्ण झाल्यानंतर 60 सेकंदात गोलंदाजी करणारा संघ पुढील षटक टाकण्यास तयार नसल्यास, डावात तिसऱ्यांदा असे घडल्यास 5 धावांचा दंड आकारला जाईल.” या 5 धावा प्रतिस्पर्धी संघाला बोनस म्हणून मिळतील.

Moshi : कार एजंटकडून तरुणाची फसवणूक

आतापर्यंत काय नियम होता? Cricket New Rule

ICC ने आत्तापर्यंत स्लो ओव्हर रेटचा सामना करण्यासाठी वनडे आणि T20 मध्ये 30 यार्ड वर्तुळात क्षेत्ररक्षक आणण्याचा नियम लागू केला होता. हा नियम जानेवारीमध्ये T20 सामन्यात आणि या वर्षाच्या सुरुवातीला जून-जुलैमध्ये झालेल्या विश्वचषक पात्रता फेरीदरम्यान एकदिवसीय सामन्यांमध्ये लागू केला होता. एकदिवसीय सामन्यात गोलंदाजीला 50 षटके टाकण्यासाठी 3 तास 30 मिनिटे दिले जातात, तर टी-20 मध्ये 20 षटके टाकण्यासाठी 1 तास 25 मिनिटांचा अवधी दिला जातो, अधिक वेळ घेतल्यास 30 यार्डचा नियम लागू करण्यात आला होता. आणि आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.22 अंतर्गत दंडाची तरतूदही होती.

नवीन नियम कोणत्या स्वरूपात लागू होईल –

ICC ने सध्या फक्त पुरुषांच्या ODI आणि T20 मध्ये ‘स्टॉप क्लॉक नियम’ लागू केला आहे. जी (Cricket New Rule) आता प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आला आहे. यापुढे याबाबत निश्चित निर्णय घेतला जाईल. ‘स्टॉप क्लॉक नियम’ डिसेंबर 2023 ते एप्रिल 2024 दरम्यान सहा महिन्यांसाठी प्रयोगिक तत्वावर लागू करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.