Chinchwad News : जनजागृतीपर संदेश देत अनिल खेडकर यांचा चिंचवड ते गंगासागर सायकल प्रवास

 एमपीसी न्यूज – देशभरात भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून यानिमित्त सदभावना सायकल रॅली म्हणून चिंचवड येथील (Chinchwad News) माजी प्राचार्य अनिल खेडकर यांनी वयाच्या 59 व्या वर्षी ‘स्वछभारत सुंदर भारत ‘ ,प्रदूषण मुक्त नद्या व वृक्ष संवर्धनाचा संदेश देत पाच नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर या कालावधीत आकुर्डी ते गंगासागर असा 1857 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला.

दिवसाला 150 ते 180  किलोमीटर प्रवास केला. अहमनगर, औरंगाबाद, नागपूर, संबलपूर, छत्त्तीसगड ,ओरिसा ,झारखंड मार्गे वेस्ट बंगाल गंगासागर 18 दिवसात हा प्रवास पूर्ण केला. (Chinchwad News) वाटेत अनेक ठिकाणी प्रवासात नागरिकांच्या वतीने सत्कार देखील झाल्याने खूप समाधान वाटायचे तसेच विविध राज्यातील जंगल प्रवास अविस्मरणीय राहील असेही खेडकर म्हणाले.

Nigdi News : “शब्दरंग साहित्य कला कट्टा” आयोजित ‘आता खेळा नाचा’ला प्रतिसाद

या मोहिमेसाठी नितीन घोटकुले, दिलीप निंबारकर , संदीप बागडे, पोपट साठे आणि महेंद्र वाघरे यांचे सहकार्य लाभले. आता परत काही दिवसात लेह लडाख मोहीम कारण्याचे नियोजित असल्याचेही अनिल खेडकर म्हणाले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.