Nigdi : डांबराचा ट्रक चेंबरमध्ये फसला; डांबर फळांच्या दुकानावर सांडले (व्हिडीअो)

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. त्यासाठी परिसरातील रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या कामासाठी डांबरी खडी घेऊन जाणारा ट्रक प्राधिकरणातील एका रस्त्यावर चेंबरमध्ये फसला आणि पलटी झाला. यावेळी ट्रकमधील डांबरी खडी फळांच्या दुकानावर सांडले.

शनिवारी (दि. 3) प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. आगामी लोकसभेचा नारळ या सभेमध्ये फोडण्यात येणार आहे. त्यामुळे या सभेची जोरदार तयारी सुरु आहे. प्राधिकरण परिसरातील रस्त्यांच्या डागडुजीची कामे देखील जोरात सुरु आहेत. मात्र रस्त्यांच्या डागडुजीचे कामांना रस्त्यात पडलेल्या खड्डे आणि खचलेल्या चेंबरचा त्रास होत आहे.

डांबर घेऊन जाणारा ट्रक (एम एच 14 / ए एस 9160) आज (गुरुवारी) प्राधिकरण येथील सिंधू नगर बस स्टॉप समोर खचलेल्या चेंबरमध्ये अडकला. ट्रक मधील डांबर रस्त्याच्या बाजूला असलेल्या फळांच्या दुकानावर सांडले. दुकानातील फळांवर डांबर सांडल्यामुळे फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

https://www.youtube.com/watch?v=ga-r_E0S_14&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.