Pimpri : अखेर बससेवा सुरु 

एमपीसी  न्यूज – गंगा आशियाना, गंगा मिडोज, पवारनगर, थेरगाव गावठाण, काळेवाडी फाटा मार्गे पिंपळेनिलख बससेवा अखेर सुरु करण्यात आली. 

अनेक वर्षांपासून हा  प्रवाशांचा प्रश्न प्रलंबित होता. तो दिवाळीच्या मुहूर्तावर संपला. माजी नगरसेविका झामाबाई बाळासाहेब  बारणे यांनी अनेक वर्षे या बससेवेसाठी पीएमपीकडे पाठपुरावा केला. अखेर या पाठपुराव्याला यश आले. माजी नगरसेविका झामाबाई बारणे यांच्या हस्ते या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सिध्देश्वर बारणे, नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.