Dapodi : दापोडी येथील वाहतुकीमध्ये तात्पुरता बदल

Temporary changes in traffic at Dapodi

एमपीसी न्यूज – दापोडी येथील रेल्वे फाटकाचे खडी, स्लिपर्स आणि रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम सुरु होणार असल्याने पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक शाखेअंतर्गत दापोडी रेल्वे गेट येथे 21 जूनला सात ते आठ या दरम्यान वाहतुकीमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

या बदलानुसार या मार्गे जाणारी वाहने कासारवाडी रेल्वे फाटककडे न जाता सरळ पुणे-मुंबई रोडने फुगेवाडी चौकात डावीकडे वळून इच्छित स्थळी जातील.

तसेच ही वाहने फुगेवाडी चौकातूनही इच्छित स्थळी जातील. या तात्पुरत्या वाहतूक बदलाबाबत सेंट्रल रेल्वेचे कर्मचारी व वाहतूक कर्मचारी यांना सहकार्य करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.