Pimpri: रेकॉर्डब्रेक रुग्णवाढ! दिवसभरात 124 जणांना कोरोनाची लागण; 83 जणांना डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू

Record-breaking patient growth! 124 people infected with corona during the day; 83 discharged, three killed

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 107 आणि महापालिका हद्दीबाहेरील 17 अशा 124 जणांना आज (शनिवारी) कोरोनाची लागण झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वांत मोठी रुग्ण वाढ आहे. महापालिका रुग्णालयातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 83 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, क्रांतीनगर आकुर्डीतील 58 वर्षीय पुरुष, जुन्नर येथील 30 वर्षीय महिला आणि कोथरुड येथील 57 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 1676 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शहरातील निराधारनगर पिंपरी, नेहरुनगर, मोरेवस्ती चिखली, नानेकरचाळ पिंपरी, सिध्दार्थ चाळ पिंपरी, भोसरी, शिवसाईनगर दिघी, सोनिगरा चिंचवड, जगताप डेअरी पिंपळे निलख, दुर्गानगर चिखली, दत्तनगर चिंचवड, यमुनानगर, साईबाबानगर चिंचवड, त्रिमुर्तीनगर चिंचवडगाव, वैदुवस्ती पिंपळे गुरव, जयभिमनगर दापोडी, पंचशील नगर पिंपळे निलख, पिंपरी, रमाबाईनगर पिंपरी, आनंदनगर चिंचवड, सेक्टर-४ मोशी, जुनी सांगवी, गणेशनगर पिंपरी, संत तुकारामनगर पिंपरी, खान्देशनगर मोशी, मोरवाडी, दिघीरोड भोसरी, गणेशनगर सांगवी, बौध्दनगर पिंपरी, विद्यानिकेतन निगडी, विशालनगर पिंपळे निलख, इंद्रायणीनगर भोसरी, डिलक्स चौक पिंपरी, मोरयानगर चिंचवडगाव, प्रियदर्शननगर सांगवी, रामनगर चिंचवड, पुर्णानगर चिंचवड, स्विसकाउंटी थेरगाव, कुंजीरवस्ती पिंपळे सौदागर, अजंठानगर, विठ्ठलनगर पिंपरी, महात्मा फुलेनगर पिंपरी, अष्ठविनायक कॉलनी काळेवाडी, टिळक कॉलनी थेरगाव परिसरातील  107 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामध्ये 67 पुरुष आणि 40 महिलांचा समावेश आहे.

याशिवाय  शिरपुर धुळे, देहुरोड कॅन्टोनमेंट, खडकी, कोथरुड, मंगळवार पेठ, कल्याणीनगर, कोंढवा, बोपोडी, नवीपेठ, जुन्नर  येथील सात पुरुष, दहा महिला अशा 17 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.  त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर, जयभिम नगर दापोडी, कस्पटेवस्ती थेरगाव, अजंठानगर, बौध्दनगर पिंपरी, साईबाबनगर चिंचवड, गुलाबनगर दापोडी, महात्मा फुले सोसायटी निगडी, नानेकरचाळ पिंपरी, शाहुनगर चिंचवड, सदगुरु कॉलनी वाकड, बालाजीनगर भोसरी, आळंदीरोड भोसरी, पत्राशेड पिंपरी, गणेशम पिंपळे सौदागर, जयरामनगर जुनी सांगवी, पवारवस्ती दापोडी, माऊली चौक वाकड, विनायकनगर पिंपळे निलख, काळेवाडी, सिध्दार्थनगर दापोडी, दिघीरोड भोसरी, काळभोरनगर, आनंदनगर चिंचवड, दत्तनगर दिघी, संततुकाराम नगर भोसरी, नेहरुनगर, भाटनगर, बोपखेल, वैभवनगर पिंपरी, मिंलीदनगर पिंपरी, त्रिवेणीनगर, शिंदेनगर जुनी सांगवी, मोरेवस्ती चिखली, औंध, जुन्नर, खेड, खडकी व चाकणयेथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या, कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 83 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आजपर्यंत 1676 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1037 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 28 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 23 अशा 51 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 601 सक्रीय रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !
#दाखल झालेले संशयित रुग्ण – 230
# पॉझिटीव्ह रुग्ण – 124
#निगेटीव्ह रुग्ण – 170
#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 267
#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 900
#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 504
#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 1676
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 601
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  51
#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 1037
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 23211
#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 72681

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.