Dehruaod corona Update : खुशखबर ! देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्द कोरोनामुक्त; आज शेवटच्या कोरोनामुक्त रुग्णाला डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज (शुक्रवारी ) कोरोनामुक्त झालेल्या शेवटच्या एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळेआता हद्दीत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1343 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

त्यातील एकूण 1308 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. होम आयसोलेशन, रुग्णालय आणि सक्रिय रुग्णांची संख्या शून्य असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महात्मा गांधी कोविड सेंटरमध्ये सध्या एकही रुग्ण दाखल नाही. कोरोनामुळे आजपर्यंत 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देहूरोड हद्दीतून आज कोरोनामुक्त झालेल्या शेवटच्या रुग्णाला घरी सोडण्यात आले. त्यामुळे सध्या हद्दीत कोरोनाचा एकही रुग्ण नाही. मात्र, तरीही नागरिकांनी गाफील राहू नये. नागरिकांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचा वेगाने प्रसार होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे स्वयंशिस्त पाळून शासन निर्देशाप्रमाणे सॅनिटायझर आणि मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग आदी नियमांचे पालन करावे,  असे आवाहन देहूरोड कॅंटोन्मेंट प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देहूरोड कोरोनामुक्त होणे ही देहूरोडच्या जनतेसाठी ‘गुड न्यूज’ आहे. मात्र, अद्यापही कोरोना पूर्णपणे हद्दपार झालेला नाही. त्यामुळे कुणीही गाफील राहू नये. सॅनिटायझर, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंसीगचे पालन प्रत्येकाने करावे. येत्या दोन महिन्यात कॅंटोन्मेंट हद्दीत कोरोना लसीकरण होणार आहे. तोपर्यंत कोरोनाबाबतच्या नियमांकडे दुर्लक्ष करु नये. रघुवीर शेलार – उपाध्यक्ष, देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.