Dehu : पादचारी महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज – पायी जाणाऱ्या महिलेची 10 ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली आहे. ही घटना सोमवारी (दि.6) देहु-आळंदी (Dehu) रोडवर घडली.

Chinchwad Bye-Election : घरोघरी जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांची जनजागृती मोहीम सुरू

याप्रकरणी महिलेने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची भावजय पायी जात असताना आरोपी दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची साखळी त्यामध्ये 3 ग्रॅमचे लॉकेट असा ऐवज हिसकावून नेला. देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस चोरट्यांचा शोध घेत (Dehu) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.