Kiwale : महिलेचा विनयभंग करत पतीला मारहाण

एमपीसी न्यूज – महिलेला शेरेबाजी करत (Kiwale) तिचा विनयभंग केला व जाब विचारण्यासाठी आलेल्या पतीला मारहाण केली आहे. हा प्रकार किवळेतील आदर्शनगर येथे सोमवारी (दि.6) रात्री घडला. याप्रकरणी देहुरोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

अमित गजानन वानरे (वय 32 रा. किवळे) व सुलतान युसुफ खान (वय 27 रा. देहुरोड) अशी अटक आरोपींची नावे असून पीडित महिलेने याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Dehu : पादचारी महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी हिसकावली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला या त्यांच्या (Kiwale) पतीला शोधण्यासाठी जात असताना आरोपीने महिलेला हटकले व अश्लिल शेरेबाजी केली. यावेळी फिर्यादीचे पती तेथे आले व त्यांनी जाब विचारला असता, आरोपींनी त्यांना मारहाण केली, पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला तर फोन आपटून त्याचे नुकसान केले. व शिवीगाळ केली. यावरून देहुरोड पोलिसानी आरोपींना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.