Kiwale : भाड्याने दिलेल्या दुचाकी परत न देता अडीच लाखांचा फसवणूक

एमपीसी न्यूज – भाड्याने दिलेल्या (Kiwale) दुचाकी परत न देता अडीच लाखांची फसवणूक करण्याचा प्रकार 18 डिसेंबर 2023 रोजी किवळे येथे घडला.  

रावेत पोलीस ठाण्यात अशोक बोरीटकर (वय 30, रा.सुखवानी) यांनी गुरुवारी (दि.22) फिर्याद दिली आहे. यावरून अमीर काझीमिया काझी ( रा. तुकाई नगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : गुटखा साठवणूक प्रकरणी तरुणाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मित्राकडून 1 लाख 25 हजार रुपयांची रॉयल एनफील्ड, तसेच आर.वन यमाहा 1 लाख 25 हजार रुपयांच्या दोन दुचाकी भाड्याने घेतली. तसेच परत करण्यासाठी फोन केला, की उडवा- उडवीची उत्तरे दिली. तसेच आज अखेर पर्यंत गाड्या परत न करता फिर्यादीची अडीच लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.