Dehuroad : मारहाण केल्याचा जाब विचारल्याने तरुणावर वार
एमपीसी न्यूज – मारहाण केल्याचा जाब विचारल्यावरून चार जणांनी (Dehuroad)मिळून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच जखमी तरुणाच्या मित्रांना दगडाने मारहाण करत दहशत निर्माण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 22) मध्यरात्री सव्वा एक वाजता शितळानगर, किवळे, देहूरोड येथे घडली.
मनोज हरीगोपाल शेट्टी असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संजय कालिदास बिसवास (वय 25, रा. शितळानगर 2, किवळे, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुधीर हनुमंत तेलगू (वय 19), सुरेश उर्फ चिन्ना हनुमंत तेलगू (वय 20, दोघे रा. शितळानगर 2, किवळे, देहूरोड) आणि त्यांच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune :एकटया सुप्रिया सुळे यांचं नव्हे तर अनेक खासदारांचे निलंबन झाले : अजित पवार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय, (Dehuroad)जितेंद्र चौपाला हे एकाच रूममध्ये राहतात. आरोपी सुधीर आणि सुरेश यांनी जितेंद्र याला मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचे मित्र आरोपींकडे गेले.
त्यावेळी आरोपींनी धारदार शस्त्राने मनोज शेट्टी याच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर अन्य आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना दगडाने मारहाण केली. ‘कोणी मध्ये आले तर एकेकाला खलास करतो’ अशी आरोपींनी परिसरातील नागरिकांना धमकी दिली. आरोपींच्या दहशतीमुळे नागरिक सैरावैरा पळून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.