Wakad : पार्ट टाइम जॉबच्या बहाण्याने सात लाख 87 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – पार्ट टाइम जॉब देण्यासाठी प्रीपेड टास्क देऊन (Wakad)त्याचे पैसे वेगवेगळ्या बँक खात्यांवर घेत एका व्यक्तीची सात लाख 87 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 23 एप्रिल ते 22 डिसेंबर 2023 या कालावधीत वाकड येथे घडली.

याप्रकरणी 35 वर्षीय व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8584008666 हा व्हाट्सअप क्रमांक धारक, globlebtcdeal.com वेबसाईट धारक, वेगवेगळ्या बँकांच्या आठ खातेधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Pune : ख्रिसमस मध्ये सर्व धर्मियांनी शुभेच्छा द्याव्यात:पुण्यातील मान्यवरांचे आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत(Wakad) व्हाट्सअपवरून संपर्क केला. आरोपींनी फिर्यादी यांना पार्ट टाइम जॉब देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांनी फिर्यादीस एका टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन केले. प्रथम फ्री टास्क आणि त्यांनतर प्रीपेड टास्क देत टास्क पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांवर वेळोवेळी सात लाख 87 हजार 400 रुपये घेतले.

पैसे घेऊन आरोपींनी फिर्यादीस काम दिले नाही. तसेच फिर्यादीचे पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.