Pune : ख्रिसमस मध्ये सर्व धर्मियांनी शुभेच्छा द्याव्यात:पुण्यातील मान्यवरांचे आवाहन

एमपीसी न्यूज – सामाजिक सलोखा वाढविण्याच्या दृष्टीने ख्रिसमस सणाच्या (Pune)शुभेच्छा सर्व धर्मियांनी द्याव्यात,सर्व धर्मातील धार्मिक सण एकत्रित पणे साजरे करावेत,असे आवाहन आज पुणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पत्रकाद्वारे केले आहे.

डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ पी ए इनामदार,अल्पसंख्य हक्क विषयक विधी सल्लागार ऍड.मार्कस देशमुख,बिशप डॉ.अनिलकुमार सारवंड,रेव्हरंड नाना दार,बिशप अँड्र्यू राठोड,हाजी गुलाम महमद एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त सिकंदर पटेल यांनी हे आवाहन केले आहे.

Ravet : वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांना अटक

‘पुणे हे सर्व धर्मियांना,सर्व विचारप्रवाहांना सामावून घेणारे शहर (Pune)आहे. सर्वच धर्मातील नागरिक येथे गुण्यागोविंद्याने राहतात. हा सलोखा आणि स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी ख्रिश्चन बांधवांना ख्रिसमसच्या शुभेच्छा सर्वधर्मियांनी द्याव्यात,सर्व धार्मिक सण एकत्रितपणे साजरे केले जावेत.त्यातून एकोपा,बंधुभाव वाढीस लागेल’,असे त्यांनी म्हटले आहे.

‘भारत हा विविधतेत एकता मानणारा देश आहे. सध्याच्या विद्वेषाच्या वातावरणात शांती,एकात्मता राखून देशाची अखंडता अबाधित राखण्यासाठी सर्वच धर्मियांनी एकमेकांच्या सणाला एकत्रित येऊन सदिच्छा व्यक्त करणे हे उपयुक्त ठरणार आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.