Kiwale : 70 हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटांसह तरुणाला किवळेतून अटक

एमपीसी न्यूज – 70 हजार रुपये किंमतीच्या  बनावट (Kiwale) नोटांसह 22 वर्षीय तरुणाला देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि.25) किवळे येथील मुकाई चौक येथे करण्यात आला आहे.

 

ऋतिक चंद्रमणी खडसे (वय 22 रा.देहुगाव) अये अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्याचे   पोलीस अमंलदार किशोर परदेशी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Pune : स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा 70 हजाररुपये किंमतीच्या बनावट प्रटींग असलेल्या 140 नोटा या चलनात आणण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडील 70 हजार रुपयांचा नोटा जप्त केल्या,याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Kiwale) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.