Dehu : देहूत कबड्डी पंच शिबीर संपन्न

एमपीसी न्यूज : देहूगाव येथील फोर एस इंग्लिश मिडियम (Dehu) शाळेच्या जिम्नॅशियम हॉलमध्ये पुणे जिल्हा कबड्डी पंचाचे शिबीर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षा अर्जुन पुरस्कार प्राप्त शकुंतला खटावकर, माजी कार्याध्यक्षा वासंती सातव- बोर्डे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, उपकार्याध्यक्ष राजेंद्र काळोखे, सरकार्यवाह व आंतरराष्ट्रीय पंच दत्तात्रय झिंजुर्डे, सहकार्यवाह शोभा शिंदे- भगत, संगीता कोकाटे, संदीप पायगुडे, पंच मंडळाचे अध्यक्ष इम्रान शेख, सचिव भरत शिळीमकर, जेष्ठ पंच वसंत झेंडे, फोर एस इंग्लिश मेडियम स्कुलचे अध्यक्ष अॅड. सुनिल काळोखे, योगेश यादव, पंचमंडळ सदस्य नंदकुमार काळोखे, संतोष जगदाळे, जिल्ह्याचे माजी सरकार्यवाह राजेंद्र आंदेकर आदी उपस्थित होते.

कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, वसंत झेंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या शिबिरात (Dehu) जिल्ह्यातील 55 पंचानी सहभागी झाले होते. यामध्ये कबड्डीच्या बदलेल्या नियमांवर चर्चा करण्यात आली.

PCMC : महापालिका आयुक्तांकडून विसर्जन घाटांची पाहणी

या शिबिरात दत्तात्रय झिंजुर्डे, राजेंद्र आंदेकर, योगेश यादव, संदीप पायगुडे, संतोष जगदाळे, इम्रान शेख, आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र काळोखे, फोर एस शाळेचे अध्यक्ष अॅड. सुनिल काळोखे व नंदकुमार काळोखे आदींनी केले होते. प्रास्ताविक इम्रान शेख, सूत्रसंचालन राजेंद्र काळोखे यांनी केले उपस्थितांचे आभार दिपक धावडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.