Dehu : देहूतील संत तुकाराम विद्यालयात 37 वर्षांनी भरली शाळा

एमपीसी न्यूज : देहू (Dehu) येथे रयत शिक्षण संस्थेच्या संत तुकाराम विद्यालयाची तब्बल 37 वर्षानंतर पुन्हा एकदा शाळा भरली. इयत्ता दहावीच्या 1986-87च्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा रविवार दि 17 मार्च रोजी स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. तेच शिक्षक, तेच विद्यार्थी व त्याच वर्गामध्ये अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात स्नेह मेळावा पार पडला.

प्रथम कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पूजन झाले. त्यानंतर राष्ट्रगीत, सरस्वती पूजन व दीप प्रज्वलाने मेळाव्यास सुरुवात झाली. त्या वेळचे शिक्षक जाधव बी जी सर, एस बी कदम सर, रमेशराव मखरे सर, मंगल मखरे मॅडम, लक्ष्मण माने सर सध्याचे शाळेचे मुख्याध्यापक बालाजी पुजारी सर, पी बी पवार सर, पी ए भुजबळ सर, डी सी लोखंडे उपस्थित होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड येथील रियल लाइफ रियल पिपल संस्थेचे संस्थापक एम ए हुसैन होते.

मनीषा जाधव, आण्णा भालेकर, राजेंद्र गाड़े, मचिंद्र हगवणे, वंदना हगवणे, विठ्ठल खोल्लम, बंसी कसबे यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांविषयी कृतज्ञता आणि शाळेला आवश्यक ती मदत करण्यास तयार असल्याची भावना व्यक्त केली.

Pune : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पहाटेपासून कारवाई; नायजेरीयन गँगच्या घरांवर छापेमारी

मखरे सर यांनी मेळाव्यास निमंत्रित करून सन्मानित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मखरे मॅडम यांनी मुलांना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देत आपल्या प्रियजनांसाठी वेळ द्या असे मार्गदर्शन केले. आज (Dehu) पैसा स्वस्त आणि वेळ महाग झाली आहे असे सांगत आपल्या पालकांसाठी त्यांची गरज ओळखून वेळ देण्यास सांगितले. जाधव सर यांनी बदलत्या काळाला सामोरे जाताना आवश्यक ते बदल करून घ्या आणि पुढे जा असे मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापक यांनी गोष्टीच्या माध्यमातून संघटित कामाचे महत्त्व विशद केले. अध्यक्ष भाषणात हुसेन यांनी या भूमीतील संत तुकाराम महाराजांच्या कार्याचा उल्लेख करत सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शशिकांत सात्रस यांनी प्रास्ताविक केले तर महादेव बोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. राजेश टिळेकर यांनी आभार मानले. मेळावा यशस्वी होण्यासाठी पिंट्या राऊळ, शांताराम मुर्हे, सतीश काळोखे, जय टिळेकर, अण्णा भालेकर, सूर्यकांत काळोखे, सुहास टिळेकर, रविंद्र झेंडे, संदीप टिळेकर, अनिल भसे, माउली मोरे यांनी मेळाव्याचे संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.