Khed : साबळेवाडी येथे भरधाव वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले

एमपीसी न्यूज : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने (Khed) झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी रात्री दहा वाजता चाकण-शिक्रापूर मार्गावर साबळेवाडी ( ता. खेड ) येथे घडला. शुभम महादेव सायकर (वय 20, रा. कर्जत, जि. अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम हे त्यांच्या दुचाकीवरून चाकण-शिक्रापूर रोडने जात होते. साबळेवाडी येथे प्राथमिक शाळेजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला (Khed) अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली.

Pune : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पहाटेपासून कारवाई; नायजेरीयन गँगच्या घरांवर छापेमारी

त्यामध्ये शुभम हे रस्त्याव पडले. त्यानंतर वाहन चालकाने शुभम यांच्या डोक्यावर वाहन चालवल्याने त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.