Chinchwad : निषाद म्युझिक अँड डान्स अकॅडमी तर्फे पंडित नंदकिशोर कपोते यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध कथ्थक नर्तक डॉक्टर पंडित नंदकिशोर कपोते (Chinchwad) यांना संगीत नाटक अकादमीचा व अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळाचा संगीत रत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.  

निगडी येथे रविवारी (दि.17) ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. पिंपरी चिंचवड पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे आणि पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन सायन्स पार्क संस्थापक संचालक यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

प्रसिद्ध कथ्थक नर्तक डॉ. पंडित नंदकिशोर कपोते यांना संगीत नाटक अकादमीचा व अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचा संगीत रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अकादमीचे संस्थापक समाधान गुडदे व संचालिका उषा गुडदे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.

 

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रवीण तुपे सर तसेच हर्ष जोशी (प्रिन्सिपल, डी आय सी स्कूल) उपस्थित होत्या. या कार्यक्रमात (Chinchwad) अकादमीतील विद्यार्थ्यांचे भरतनाट्यम गायन गिटार व किबोर्ड वादन झाले.

भरतनाट्यमच्या विद्यार्थिनींनी एकदंताय, मल्हार, जय जय सुरवर वंदे मातरम देशतिल्ना ना आधी रचना सादर केल्या. गिटार व किबोर्डच्या विद्यार्थ्यांनी पापा कहते है, गुलाबी आखे, सांग सांग भोलानाथ, इत्यादी गाणी सादर केली.

साथ संगत गिटारवर आदित्य कांबळे, ऋषी मोरे, रितिक गुरव, ड्रम स्वयं सोनवणे, तबला यश त्रिशरण, निवेदन अर्चना कदम, ध्वनी व्यवस्था परिमाल साऊंड यांनी पहिली.

त्यानंतर हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये निषाद गुडदे यांनी अलबेला साजना आयो रे, खेळ मांडला, दमा दम मस्त कलंदर ही गाणी गाऊन तसेच आसावरी गुडदे यांनी सुर निरागस हो, गणनायका बाई ग इत्यादी गाणी गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.